शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

coronavirus: कोरोना विषाणूने घेतला अजून एका आमदाराचा बळी, महिनाभरापासून सुरू असलेली झुंज अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 12:02 IST

सर्वसामान्यांसोबतच सार्वजनिक, ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमामुळे कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.

कोलकाता - देशात निर्माण झालेले कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर रूप धारण करत चालले आहे. सर्वसामान्यांसोबतच सार्वजनिक, ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमामुळे कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात अजून एका आमदाराचा बळी घेतला आहे.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते तमोनाश घोष यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मे महिन्याच्या अखेरीस त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. तमोनाश घोष हे दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.  

तमोनाश घोष यांना ट्विटरवरून श्रद्धांजली देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, फल्टा येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि १९९८ पासून पक्षाचे खजिनदार असलेले तमोनाश घोष यांचे निधन झाले हे ऐकून खूप दु:ख झाले. दीर्घकाळापासून ते आमच्यासोबत होते. पक्ष आणि जनतेप्रति ते समर्पित होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी मोठे योगदान दिले होते.  

ममता बॅनर्जी यांनी अजून एक ट्विट करून घोष यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्यात त्या म्हणतात की, घोष यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मी आम्हा सर्वांच्यावतीने त्यांची पत्नी झरना आणि दोन मुली, तसेच हितचिंतकांप्रति संवेदना व्यक्त करते.    

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMLAआमदार