Coronavirus: विनाकारण घराबाहेर पडले अन् थेट अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अडकले; 'हा' व्हिडीओ नक्की पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:18 AM2020-04-25T08:18:14+5:302020-04-25T08:21:22+5:30

पोलिसांच्या अनोख्या कारवाईचा हा व्हिडीओ फेसबुक, ट्विटरवर हजारो लोकांनी लाईक्स केला आहे

Coronavirus: Tiruppur Police teaches lesson to lockdown violators pnm | Coronavirus: विनाकारण घराबाहेर पडले अन् थेट अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अडकले; 'हा' व्हिडीओ नक्की पाहा!

Coronavirus: विनाकारण घराबाहेर पडले अन् थेट अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अडकले; 'हा' व्हिडीओ नक्की पाहा!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहेलॉकडाऊनकाळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दलवारंवार आवाहन करुनही ऐकत नाही अशा महाभागांना मिळाला धडा

तिरुपूर – देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना सोशल डिस्टेंसिगचं पालन करणे गरजेचे आहे. यासाठी देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. सध्या देशात २३ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे.

मात्र या लॉकडाऊन काळात काही लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसतात. वारंवार प्रशासनाकडून लोकांना घराबाहेर पडू नका, कोरोनाविरुद्ध युद्ध घरीच राहून जिंकायचं आहे असं आवाहन केले जाते. तरीही अनेक जण या आवाहनाला केराची टोपली दाखवत बाहेर फिरताना दिसतात. अशावेळी पोलिसांकडून या महाभागांची चांगलीच धुलाई होताना अनेक व्हिडीओ सोशल मीडियात फिरले आहेत.

एवढं करुनही काही लोक ऐकत नसतील तर त्यांची आरती करणे, गांधीगिरी मार्गाने त्यांचा सत्कार करणे, रस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा देणे अशा अनेक कारवाईदेखील केल्या. सध्या सोशल मीडियात तामिळनाडू येथील तिरुपूर पोलिसांच्या कारवाईचा एक व्हिडीओ प्रचंड गाजत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या महाभागांना तिरुपूर पोलिसांनी जी शिक्षा दिली ती पाहता ही मुलं पुन्हा घराबाहेर पडताना नक्कीच १०० वेळा विचार करतील.

हा व्हिडीओ फेसबुक, ट्विटरवर हजारो लोकांनी लाईक्स केला आहे. यात पाहू शकता की, तीन मुले एका स्कुटीवरुन येत असतात. त्यांना पोलिसांकडून अडवलं जातं. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या या मुलांना थेट अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकण्यात येतं. कोरोनाच्या धास्तीने ही मुलं प्रचंड घाबरतात, पोलिसांकडे विनवण्या करतात. या अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतून बाहेर निघण्याचाही प्रयत्न करतात. त्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये कोरोना पेशंटही असतो. त्यामुळे या पेशंटकडून या मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा खराखुरा कोरोना रुग्ण नसतो तर तो प्रशासनाचा एक कर्मचारी असतो. पोलिसांच्या या भन्नाट कल्पनेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या महाभागांना अशाचप्रकारे धडा शिकवला पाहिजे अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करतात.

 

Web Title: Coronavirus: Tiruppur Police teaches lesson to lockdown violators pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.