शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 20 एप्रिलनंतर 'या' ठिकाणचा लॉकडाऊन शिथील होईल, पण...; पंतप्रधानांचे महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 10:58 IST

स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हॉटस्पॉटबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागेल, अशा सूचनाही मोदींनी नागरिकांना केल्या आहेत.

ठळक मुद्देमोदींनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. कठोर पावलं उचलावी लागणार आहेत, तसेच नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सुरू असलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, असंसुद्धा मोदींनी सांगितलं आहे. मोदींनी आज जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. कठोर पावलं उचलावी लागणार आहेत, तसेच नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं आहे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एकही रुग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हॉटस्पॉटबाबत अधिक सतर्कता बाळगावी लागेल, अशा सूचनाही मोदींनी नागरिकांना केल्या आहेत.20 एप्रिलपर्यंत कोरोना लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. जी ठिकाणे सुरक्षित असतील तिथे थोडी शिथिलता मिळेल. उद्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, ज्या क्षेत्रांनी आपलं हॉटस्पॉट वाढू दिलेलं नाही, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. जेव्हा देशात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणाऱ्या लोकांची टेस्टिंग सुरू केली होती. जगातल्या बड्या बड्या राष्ट्रांची स्थिती पाहिल्यास भारताची स्थिती खूप नियंत्रणात आहे, असंसुद्धा मोदींनी स्पष्ट केलं आहे.लॉकडाऊनच्या या काळात देशातील लोक ज्याप्रकारे नियमांचं पालन करत आहेत, ज्याप्रकारे घरातच राहून सण-उत्सव साजरा करत आहेत, ते प्रशंसनीय असल्याचंही मोदींनी अधोरेखित केलं आहे. कोरोना या साथीच्या लढाईविरोधात, भारत नेटाने लढत आहे. तुमच्या धिरामुळे, त्यागामुळे आतापर्यंत कोरोनामुळे होणारं नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आल्याचा उल्लेखही मोदींनी केला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनविताना, आम्ही गरीब आणि दैनंदिन वेतन कामगारांचे हित लक्षात घेतलेले आहे. रब्बी पिकांच्या काढणीचे कामही सुरू आहे. शेतकर्‍यांनी कमीत कमी समस्यांना सामोरे जावे यासाठी केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार एकत्र काम करीत आहेत, असंसुद्धा मोदींनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस