शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

"तिसरी लाट येणार हे निश्चित, लॉकडाऊनमध्ये सूट देणं ठरेल धोकादायक"; IMA नं राज्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 20:43 IST

भारतीय वैद्यकीय संघटनेनं (IMA) देशातील सर्व राज्य सरकारांना कोरोना प्रादुर्भावासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना आयएमएनं राज्यांच्या सरकारांना दिल्या आहेत.

भारतीय वैद्यकीय संघटनेनं (IMA) देशातील सर्व राज्य सरकारांना कोरोना प्रादुर्भावासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना आयएमएनं राज्यांच्या सरकारांना दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विसरुन चालणार नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेआधी देशात जास्तीत जास्त लोकसंख्येचं कोरोना विरोधी लसीकरण करणं अतिशय गरजेचं असल्याचंही आयएमएनं नमूद केलं आहे. देशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन काटेकोर पद्धतीनं केलं जात नसल्याच्या मुद्द्यावरही आयएमएनं बोट ठेवलं आहे आणि देशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन झालं नाही तर देशाला तिसऱ्या लाटेला निश्चितपणे सामोरं जावं लागेल, असा स्पष्ट इशारा आयएमएनं राज्यांना दिला आहे. (Coronavirus: 'Third wave sure, relaxation in lockdown will be heavy' IMA gave strict warning to the states)

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्रिय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांच्या सेवाभावामुळे भारत कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे. पण आपल्याला तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारा संदर्भात गेल्या दीड वर्षातील आपल्या अनुभवानुसार एक गोष्ट लक्षात आली आहे की जास्तीत जास्त लसीकरण करणं हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे", असं आयएमएनं म्हटलं आहे. 

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावंकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप अद्याप पूर्णपणे संपलेला नसतानाही देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन सर्सासपणे होत असल्याचं दिसून आल्याच्या मुद्द्यावरही आयएमएनं चिंता व्यक्त केली. देशातील पर्यटन, तीर्थ यात्रा, धार्मिक उत्साह या सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे हे देखील आयएमएनं मान्य केलं. पण यासाठी काही महिन्यांची वाट पाहिलेलं खूप चांगलं ठरेल. सध्या देशात काही पर्यटन स्थळावर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलं आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. वेगानं कोरोना विरोधी लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे, असं आयएमएनं म्हटलं आहे. 

लसीकरणाबाबत बोलायचं झालं तर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे ३८.८६ कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे आजही कोरोना लसीचे १.५४ कोटींहून अधिक लसीचे डोस उपलब्ध आहेत. याशिवाय देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३७ हजार १५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस