शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तिसरी लाट लहान मुलांना घातक? लक्षणांबद्दल लॅन्सेटमध्ये नवीन संशोधन, जाणून घ्या निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 08:23 IST

Coronavirus Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत केरळात वाढ होऊ लागल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठेल, असेही अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाबाधितांच्या संख्येत केरळात वाढ होऊ लागल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठेल, असेही अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका नसल्याचे स्पष्ट होत आहे. लॅन्सेट या मासिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. 

काय आढळले संशोधनात?- ज्या मुलांना कोरोना होतो ती सहा दिवसांत बरी होतात. - चार आठवड्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे राहिलेल्या मुलांचे प्रमाण अवघे ४ टक्के होते.- लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अल्पकाळ टिकतात, असे अहवालात नमूद आहे.- १७३४ मुलांचा डेटा या अभ्यासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता.  

कोणी केले संशोधन?- लंडन येथील किंग्ज कॉलेज येथील संशोधकांनी ‘झो कोविड’ स्टडी स्मार्टफोन ॲपचा वापर करून लहान मुलांवर कोरोनाच्या लक्षणांचा अभ्यास केला. - या ॲपवर १७ वर्षांपर्यंतच्या अडीच लाख मुलांचा डेटा उपलब्ध होता. संशोधकांच्या चमूने १ सप्टेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संकलित करण्यात आलेल्या अहवालांवर लक्ष केंद्रित केले.

निष्कर्ष काय? लहान मुलांमध्ये कोरोना फार काळ न टिकता सरासरी सहा दिवसांत बरा होतो.कोरोनाची तीव्र बाधा होत नाही. सौम्य लक्षणे लहान मुलांमध्ये आढळतात. ते लवकर बरे होऊ शकतात.मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले चार आठवड्यांपर्यंत बरे झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य