शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 12:35 IST

CoronaVirus : डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे.

डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले. तसेच, कोरोना साथीच्या काळात लोकांची रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशा परिस्थितीत हे कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचे कारणही बनू शकते. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक सहजपणे कोरोनाच्या या लाटेत येऊ शकतात, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटले आहे.

जर अशी प्रतिकारशक्ती कमी राहिली तर ते तिसर्‍या लाटाचे एक मोठे कारण बनू शकते, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितले. याशिवाय, कोरोनाशी लढा देऊन मिळणाऱ्या प्रतिकारशक्तीला देखील नवीन व्हेरिएंट कमकुवत करु शकतो. जर असे घडले तर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट प्रतिकारशक्तीला मागे टाकेल आणि  हे संक्रमण खूप वेगाने पसरू शकते, असाही दावा डॉक्टर समीरन पांडा यांनीही केला आहे.

डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट जीवनावर अधिक कहर करतील, असे वाटत नाही, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले होते की, लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. कोरोना संसर्गाचे नवीन व्हेरिएंट येत आहेत, सरकार लॉकडाऊन आणि इतर निर्बंध कमी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस