coronavirus :...तर तुम्ही कोरोनाला 'आरामात' हरवू शकता, लालूंनी सांगितला भन्नाट फॉर्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:21 PM2020-04-09T17:21:05+5:302020-04-09T18:47:35+5:30

लालूप्रसाद यादव यांनी सुचवलेला हा फॉर्म्युला चर्चेचा विषय ठरला आहे.

coronavirus: ...Then you can beat Corona virus 'comfortably', the formula stated by Lalu Prasad Yadav BKP | coronavirus :...तर तुम्ही कोरोनाला 'आरामात' हरवू शकता, लालूंनी सांगितला भन्नाट फॉर्म्युला 

coronavirus :...तर तुम्ही कोरोनाला 'आरामात' हरवू शकता, लालूंनी सांगितला भन्नाट फॉर्म्युला 

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूला तुम्ही आरामात हरवू शकता. त्यासाठी घरात राहा आणि आराम करादेशातील इतर भागांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहेलालूप्रसाद यादव यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने आवाहन केल्यास त्यामुळे जनमानसावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो

पाटणा - देशभरात वेगाने होत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी पंतप्रधान, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनीही कोरोना विषाणूला हरवण्यासाठी एक भन्नाट फॉर्म्युला आपल्या हटके बिहारी स्टाईलमध्ये सुचवला आहे. तसेच लालू यादव यांनी हा फॉर्म्युला ट्विटरवर शेअर केला आहे. 

लालूप्रसाद यादव आपल्या ट्विटमध्ये लिहितात. 'कोरोना विषाणूला तुम्ही आरामात हरवू शकता. त्यासाठी घरात राहा आणि आराम करा' दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी सुचवलेला हा फॉर्म्युला चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील इतर भागांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने आवाहन केल्यास त्यामुळे जनमानसावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो. 

लालूप्रसाद यादव यांच्याबरोबरच त्यांचे दोन्ही मुलगे तेजस्वी आणि तेजप्रताप हेसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय राहून बाहेर अडकलेल्या बिहारी मजुरांना मदत करत आहेत. त्यासाठी त्या त्या राज्यातील सरकारांना आवाहन करत आहेत.

Web Title: coronavirus: ...Then you can beat Corona virus 'comfortably', the formula stated by Lalu Prasad Yadav BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.