शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

Coronavirus: कोरोनाविरोधातील भारताच्या लढ्याचं 'तिनं' केलं कौतुक; थेट अमेरिकेत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:51 PM

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. त्याविरोधात एका एनआरआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हैदराबाद: कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, अमेरिकेतही हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता आणि विकसित असलेल्या देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यानं जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहणाऱ्या तेलंगणातील एका महिलेनं भारत कोरोनाला रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. त्यानंतर तिच्यावर अमेरिकाविरोधात विधान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील स्वाती देवीनेनी हिने ट्विट करून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. त्याविरोधात एका एनआरआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहणा-या श्रावण नावाच्या एनआरआयने स्वाती देवीनेनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रावणच्या म्हणण्यानुसार, देवीनेनी हिने एक व्हिडीओ ट्विट केला होता, ज्यात अमेरिकीविरोधी वक्तव्यं करण्यात आली आहेत. या व्हिडीओमध्ये स्वाती देवीनेनी म्हणत आहे की, अमेरिकेसारखा शक्तिशाली देश कोरोना विषाणूसारखे साथीचे रोग रोखण्यात अपयशी ठरला आहे, तर भारताने त्यावर मात केली आहे. व्हिडीओमध्ये देवीनेनी म्हणते, 'अमेरिका चांगली आरोग्य सुविधा असलेला संपन्न देश आहे. परंतु तरीही अमेरिका कोरोना विषाणूच्या महारोगराईला रोखू शकलेला नाही. या रोगाबद्दल भारताला पूर्वकल्पना होती, ज्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यापासून रोखण्यात आले. माझा भारत महान आहे. स्वातीचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेलुगू लोकांनीही यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यानंतर सोशल मीडियावर स्वाती देवीनेनीनेही या व्हिडीओबद्दल दिलगिरी व्यक्त केली.स्वाती हिनं आपल्या स्पष्टीकरणासाठी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये म्हणते, भारताच्या तुलनेत अमेरिकेला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता. कोरोनाच्या साथीच्या रोगाचा भारत कसा सामना करीत आहे, याबद्दल मी माझ्या मातृभूमीचे फक्त कौतुक केले. या गोष्टी माझ्या स्वत: च्या नव्हत्या. मी हे इतरत्र वाचले आहे, जे आधीच सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध आहे. देवीनेनी म्हणाली, कोणीतरी हा व्हिडीओ डाऊनलोड केला आणि त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर पोस्ट केला. स्वाती देवीनेनी ही तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. वर्षभरापूर्वी ती आपल्या पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली होती. तिचे पती सॉफ्टवेअर अभियंते आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या