शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रुग्णांच्या टक्केवारीत तेलंगणा पहिल्या स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 00:48 IST

या आठवड्यात चाचण्या होणार एक कोटी

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांचा टक्केवारीत विचार केला तर तेलंगणा गुरुवारी देशात पहिल्या स्थानी होते. त्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी गेला. या आधीच केंद्राने तेलंगणाला जास्तीत जास्त चाचण्या करण्यास सांगितले होते. दिल्लीत रोजच्या रोज कोविड-१९चे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारची काळजी वाढवली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यांत रुग्णसंख्या खाली येत आहे.

‘लोकमत’ला आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात रुग्ण (पॉझिटिव्ह केसेस) १८.७ टक्के तर दिल्लीत १६.३ टक्के आहेत. महाराष्ट्रात १.८६ लाख तर दिल्लीत ८९८०२ आहेत त्या तुलनेत तेलंगणमध्ये ते १७३५७ आहेत. परंतु, या राज्यांनी फेब्रुवारीपासून विक्रमी संख्येत चाचण्या केल्या असून सततच्या प्रयत्नांनी तेथील रुग्ण संख्या घसरत चालली आहे.

केंद्र सरकारने आणि उच्च न्यायालयाने तेलंगणला कमी चाचण्या करत असल्यामुळे फटकारले नसते तर एवढे रुग्ण तेथे उघड झाले नसते. तेलंगणमध्ये रोज होणाºया चाचण्या १७ जून रोजी फक्त १०९६ होत्या. त्या आता एक जुलैच्या रात्री ७६९१ झाल्या.१७ जून रोजी तेलंगणमध्ये २६९ रुग्ण होते ते एक जुलै रोजी १७३५७ झाले. ही वाढ फक्त पंधरवड्यात ६० पटींपेक्षा जास्त झाली.गेल्या १५ दिवसांत चाचण्या सात पटीत (१०९६ वरून एक जुलै रोजी ७६९१) वाढल्या. शेजारच्या आंध्र प्रदेशने ९.१८ लाख चाचण्या केल्या व त्याचा पॉझिटिव्ह केसेसचा दर हा फक्त १.७ टक्के आहे. हा दर देशात सगळ््यात कमी आहे.37.37 लाख चाचण्याभारताने ३१ मे रोजी केलेल्या चाचण्यांची संख्या ३७.३७ लाख होती आणि पॉझिटिव्ह केसेसे होत्या ४.९ टक्के. आता हा दर ६.७ टक्के आहे. संख्येचा विचार केला तर रुग्ण १.८२ लाखांवरून ६.०४ लाख झाले आहेत. भारतात एक कोटी चाचण्या पूर्ण होतील तेव्हा तो एक विक्रम ठरेल. गुरुवारी देशात दररोज जवळपास २.३० लाख चाचण्यांची नोंद झाली. तामिळनाडूने 12.02 लाख चाचण्याकेल्या व त्याचा पॉझिटिव्ह केसेसचा दर ७.८ टक्के आहे. सर्वात जास्त 50,825चाचण्या करून घेण्यात महाराष्ट्र हा देशात पहिल्या स्थानावर होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा