शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पोलिसांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा; गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:49 IST

‘कोविड-१९’मुळे कायद्याच्या रक्षकांमध्ये बळींचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात सर्वच राज्यांमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे मत्यू ओढविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कायद्याच्या रक्षकांचे संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.

याबाबत गृह मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यात प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन दैनंदिन कामे न करणाऱ्या पोलिसांना घरून काम करण्याची मुभा देता येईल का याचा विचार व्हावा, असे सुचविण्यात आले आहे; तसेच ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी ड्यूटीवर असतात त्या कार्यालयांचे; तसेच ठिकाणांचे नीटपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लढाईत प्रशासकीय यंत्रणेतील पोलीस हा घटक अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना करण्यावर भर दिला जावा, असे निर्देशही गृह मंत्रालयाने पाठविलेल्या पत्रांमध्ये देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)महाराष्ट्रात आतापर्यंत २३० पोलिसांना संसर्गदेशात महाराष्ट्राला या भयंकर रोगाचा सर्र्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि मृतदेखील महाराष्ट्रातीलच आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी साहजिकच पोलीस व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असतानाच अनेक चौकांत पोलीस तैनात असलेले दिसून येत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी त्यांच्याकडे असलेली साधने मर्यादित आहेत. आतापर्यंत राज्यात सुमारे २३० पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याशिवाय ५ जणांचा बळीदेखील गेला आहे. यात मुंबईतील ४, तर पुण्यातील एका पोलिसाचा समावेश आहे. पुण्यात एका ५७ वर्षीय सहायक उपनिरीक्षकाला सोमवारी मृत्यूने गाठले. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालय