शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान परराज्यांतील मजुरांची स्वगृही परतण्याची धडपड; सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:38 IST

कोरोनामुळे भारतातही नवं संकट उभं राहिलं असून, हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हालाला पारावार उरलेला नाही.

ठळक मुद्देपरराज्यातून आलेले हे मजूर लॉकडाऊनदरम्यान स्वतःच्या गावी परतण्यासाठी पलायन करताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच पाहणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचं सांगण्यात आलं असून, पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे. 

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारनं देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनामुळे भारतातही नवं संकट उभं राहिलं असून, हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हालाला पारावार उरलेला नाही. त्यामुळे परराज्यातून आलेले हे मजूर लॉकडाऊनदरम्यान स्वतःच्या गावी परतण्यासाठी पलायन करताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना केंद्र सरकारनं प्रवासी मजुरांसाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं आहे.यासंदर्भात लवकरच पाहणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचं सांगण्यात आलं असून, पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे. सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, भारतातील संघटना आणि सर्व राज्य सरकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. यासंदर्भात लवकरच आपण प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यावर कोर्टाने म्हटले की, सरकार स्थलांतरित मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी आधीपासूनच चांगली कामे करीत आहेत.अशा परिस्थितीत कोर्टाला यात हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही. स्थिती अहवालाची प्रतीक्षा करत असून, त्यानंतरच निर्णय देऊ, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्ते अ‍ॅड. अ‍लख आलोक श्रीवास्तव यांना सांगितले की, 'आम्ही सर्व गोष्टी हाताळू शकतो, परंतु केंद्र सरकार जे काही प्रयत्न करत आहे, त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आधी सरकारकडून दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र पाहायचे  आहे, त्यानंतर बुधवारी सुनावणी होऊ शकेल, असंही सरन्यायाधीश शरद बोबडेंनी स्पष्ट केलं.      याचिका कोणी दाखल केली?कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी बंदमुळे बेरोजगार आणि बेघर लोक आता आपल्या गावी व खेड्याकडे जाण्यास निघाले आहेत. अशा प्रकरणात वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शेकडो किलोमीटर चालत आहेत. त्यांच्याकडे जगण्याची सुविधा नाही किंवा घरी पोहोचण्याचे साधन नाही, या लोकांना भयंकर अडचणी येत आहेत. या लोकांना निवारा गृहात ठेवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारांना आदेश द्यावेत, असा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला आहे.                   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय