शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

CoronaVirus: लॉकडाऊन कुठे कठोर ठेवायचा, कुठे शिथील करायचा हे राज्यांनी ठरवावं; मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:22 IST

मोदींकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद; लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी सर्व राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर नेमकं काय करायचं यासंदर्भात मोदींनी सर्व मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. यावेळी काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी भूमिका मांडली. तर ३ मेनंतर लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हेदेखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण तयार करा आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असं पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

आणखी काय म्हणाले पंतप्रधान?१. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते, आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. याशिवाय मृतांचा आकडादेखील कितीतरी जास्त आहे. २. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. जनतेनेदेखील साथ दिली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला, ते आपण पाहतोय.३. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.४. आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणायचे आहे. परदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे. त्यांना लगेच चाचण्या करून क्वारंटाईन करायचे आहे.५. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे.   ६. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हेदेखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.७. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण तयार करा.८. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहेत.९. ३ मे ही दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.१०. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.११. पुढे जाऊन रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी गोष्टींचा यात समावेश असेल.१२. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे संपर्क जास्तात जास्त तपासा.१३. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत१४. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज. असे झोन्स फुल प्रुफ करा.१५. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान  आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका  १६. कोरोनशिवाय इतर आजारांचा सामना कराव्या लागणाऱ्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत.१७. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे, तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली. पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.  १८. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसे जायचे याचे नियोजन आवश्यक आहे.१९. सुधारणा घडवण्याची हीच सुसंधी आहे. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.२०. प्रत्येक राज्याने सुधारणांवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला.२१. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.३ मे नंतरही लॉकडाऊन वाढणार?, पंतप्रधानांसोबतच्या VC मध्ये अनेक मुख्यमंत्र्यांची सूचनायही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅनराज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी