शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

मोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 5:32 PM

लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर आणि विद्यार्था तसेच इतर व्यक्तींसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन दरम्यान, परराज्यात अडकून पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने परवानगी दिली आहेकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकराने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर तसेच इतर लोक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लॉकडाऊन दरम्यान, परराज्यात अडकून पडलेले मजूर, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत माहिती देताना गृहमंत्रालयाने सांगितले की,’लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सर्व सुरक्षाविषय उपायांसह त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी परवानगी दिली आहे.’ काही दिवसांपूर्वी केंद्र सरकराने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच राज्यांनी मजुरांना परत आणण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन आज झारखंडला पोहोचेल. या ट्रेनमधून एकूण १२०० मजूर प्रवास करत आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथून एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन रात्री ११ वाजता झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण १२०० मजूर असून, फिजिकल डिस्टंसिग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार