शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: १२०० मजूरांना घेऊन विशेष ट्रेन तेलंगाणाहून झारखंडला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 16:01 IST

लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देतेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली आहेशुक्रवारी पहाटे ५ वाजता तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथून एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन रात्री ११ वाजता झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण १२०० मजूर असून, फिजिकल डिस्टंसिग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हैदराबाद - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत रविवारी संपत आहे. दरम्यान, या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. दरम्यान तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन आज झारखंडला पोहोचेल. या ट्रेनमधून एकूण १२०० मजूर प्रवास करत आहे.  

विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन येण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात यावी ,अशी विनंती विविध राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ५ वाजता तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथून एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन रात्री ११ वाजता झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण १२०० मजूर असून, फिजिकल डिस्टंसिग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी विशेष ट्रेनची सुरुवात अद्याप झालेली नाही. मात्र राज्य सरकारांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष् ट्रेन सोडण्यात आली आहे. अशा प्रकारे सोडलेली ही एकमेव ट्रेन आहे. मात्र पुढे राज्य सरकार आणि रेल्वेच्या सूचनेनंतरच अशा प्रकारची ट्रेन सोडली जाईल.

झारखंड सरकारने दिलेल्या माहितीनुसार झारखंडमधील सुमारे ९ लाख लोक पररज्यात अडकून पडले आहेत. यापैकी ६.४३ लाख मजूर आहेत. तर उर्वरित लोक हे नोकरी आणि अन्य कामानिमित्त गेलेले आहेत. दरम्यान, केंद्राने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांनी बाहेर अडकलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाJharkhandझारखंडIndian Railwayभारतीय रेल्वे