धक्कादायक! कोरोना संक्रमित वडिलांना रस्त्यातच सोडून पळाला मुलगा, मदतीसाठी ओरडत राहिली पत्नी; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:32 AM2021-04-26T11:32:43+5:302021-04-26T11:33:58+5:30

परिसरातील लोकांचा दबाव वाढल्यानंतर त्याने सदर रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली आणि वडिलांना उपचारासाठी पाठवले. या रुग्णवाहिकेत त्याची आई देखील होती. तर त्यांचा मुलगा आणि सून दुचाकीवर होते. यानंतर मुलगा काही सबब सांगून दुसरीकडे निघून गेला. यानंतर रुग्णवाहिका चालकही रुग्णाला रस्त्यातच सोडून निघून गेला. (Bihar)

CoronaVirus son leaves corona infected father on road wife screams for help in Bihar | धक्कादायक! कोरोना संक्रमित वडिलांना रस्त्यातच सोडून पळाला मुलगा, मदतीसाठी ओरडत राहिली पत्नी; पण...

धक्कादायक! कोरोना संक्रमित वडिलांना रस्त्यातच सोडून पळाला मुलगा, मदतीसाठी ओरडत राहिली पत्नी; पण...

Next

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपुर जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चक्क एक सरकारी शिक्षक मुलगा आपल्या कोरोनाग्रस्त वडिलांना रस्त्यातच सोडून पळाल्याची घटना घडली. तर, यावेळी सोबत असलेली त्याची आई पतीला वाचविण्यासाठी लोकांकडे जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत होती. यानंतर कसे बसे रुग्ण वृद्धाला रुग्णालयात नेण्यात आले. पण, तेथे नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. (CoronaVirus son leaves corona infected father on road wife screams for help in Bihar)

ही घटना मुझफ्फरपूर शहरातील दमुचक भागात घडली. येथे राहणारे अर्जुन ओझ दोन दिवसांपूर्वीच कोरोना संक्रमित झाले होते. ते तेव्हापासून घरीच होते. त्यांचे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी घेऊन जात नव्हते. त्यांचा मुलगा सरकारी शिक्षक आहे. परिसरातील लोकांचा दबाव वाढल्यानंतर त्याने सदर रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली आणि वडिलांना उपचारासाठी पाठवले. या रुग्णवाहिकेत त्याची आई देखील होती. तर त्यांचा मुलगा आणि सून दुचाकीवर होते.

सबब सांगून फरार झाला मुलगा -
यानंतर मुलगा काही सबब सांगून दुसरीकडे निघून गेला. यानंतर रुग्णवाहिका चालकही रुग्णाला रस्त्यातच सोडून निघून गेला. यानंतर सोबत असलेली पत्नी मदतीसाठी लोकांची याचना करत होती. ती मदतीसाठी आरडा-ओरड करत होती. मात्र, कुणीही मदतीसाठी समोर आले नाही. यानंतर कुणी तरी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला.

या व्हायरल व्हिडिओची माहिती मुझफ्फरपूर डीएमपर्यंत पोहोचली. यानंतर त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना संबंधित रुग्णाला सदर रुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले. मात्र, तोवर त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. यामुळे येथील डॉक्टरांनी त्यांना एसकेएमसीएचला रेफर केले. मात्र, येथे कागदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच रुग्णाचा मृत्यू झाला. अर्जून ओझा असे या रुग्णाचे नाव. यानंतर पत्नीने सांगितले, की गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते उपचारासाठीच मुझफ्फरपूर येथे आले होते.

Web Title: CoronaVirus son leaves corona infected father on road wife screams for help in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.