शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In India: धोका टळलेला नाही! या चार राज्यांची कोरोना पाठ सोडेना; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 20:25 IST

Corona Virus In India: गेल्या आठवड्याभरात जगभरात कोरोना विषाणूचे दैनंदिन पातळीवर सरासरी २६,४९,००५ रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिली.

Corona Virus In India: गेल्या आठवड्याभरात जगभरात कोरोना विषाणूचे दैनंदिन पातळीवर सरासरी २६,४९,००५ रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिली. यासोबतच देशभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत जगभरात ३१,४४,६२२ रुग्ण दैनंदिन पातळीवर आढळून येत होते. पण आता त्यात घट झाली आहे. जगभरातील १४० देशांमध्ये आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण १० देशांमध्ये आढळत असल्याची माहिती संयुक्त आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं. 

अमेरिका, फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्ये सातत्यानं रुग्णसंख्या कमी होताना दिसत असल्याचंही लव अग्रवाल म्हणाले. देशात सध्या ७ लाख ९० हजार ७८९ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. गेल्या आठवड्यात दैनंदिनरित्या सरासरी ९६,३९२ रुग्ण आढळून येत होते. २१ जानेवारी रोजी तर देशात एकाच दिवशी ३ लाख ४७ हजार २५४ रुग्ण आढळून आले होते. आता रुग्णसंख्या ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. आज देशात ६७ हजार ०८४ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. 

केरळमध्ये अडीच लाखाहून अधिक सक्रिय रुग्णदेशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ४.४४ टक्क्यांवर आला आहे. ५० हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या राज्यांची संख्या आता ८ वरुन ४ राज्यांवर आली आहे. तर २१ राज्यांमध्ये १० हजाराहून कमी रुग्ण आहेत. एकट्या केरळमध्ये सध्या अडीच लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. ४ राज्यांमध्ये ६१ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर ३४ राज्यांमध्ये सातत्यानं पॉझिटिव्हीटी रेट घसरत असल्याचं दिसून आलं आहे. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या चार दिवसांपासून देशात १ लाखापेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत आणि पॉझिटिव्हीटी रेट सुद्धा ५ टक्क्यांच्या खाली गेला आहे. पण केरळमध्ये २९ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर केरळसह मिझोराम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल आणि सिक्किममधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. त्यामुळे निष्काळजीपणा बाळगून चालणार नाही, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस