शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

coronavirus: धक्कादायक! कुंभमेळ्यातून परतलेल्या ६१ भाविकांपैकी ६० जणांना कोरोनाचा संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 11:00 IST

coronavirus in India : कुंभमेळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. (haridwar kumbh mela 2021) कुंभमेळ्यात सहभागी होऊन देशाच्या विविध भागात गेलेल्या भाविकांच्या माध्यमातून कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे.

ठळक मुद्देविदिशा येथील ८३ भाविक तीन वेगवेगळ्या बसमध्ये बसून ११ ते १५ एप्रिलदरम्यान हरिद्वार येथे गेले होतेयामधील ६१ भाविकांपैकी ६० जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेपॉझिटिव्ह सापडलेल्या ६० पैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे

भोपाळ - देशात कोरोनाचा फैलाव होत असतानाही उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (coronavirus in India) मात्र या कुंभमेळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. (haridwar kumbh mela 2021) कुंभमेळ्यात सहभागी होऊन देशाच्या विविध भागात गेलेल्या भाविकांच्या माध्यमातून कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा येथे कुंभमेळ्यातून परतलेल्या ८३ भाविकांपैकी ६१ भाविकांची तपासणी केली असता त्यापैकी ६० भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. तर उर्वरित २२ भाविकांची काही माहिती मिळत नाही आहे. (Out of 61 devotees returning from Kumbh Mela, 60 were infected with coronavirus)

ही घटना मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या ग्यारसपूर येथे घडली आहे. विदिशामधील जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ८३ भाविक तीन वेगवेगळ्या बसमध्ये बसून ११ ते १५ एप्रिलदरम्यान हरिद्वार येथे गेले होते. हे भाविक २५ एप्रिल रोजी ग्यारसपूर येथे परतले होते. मात्र कुंभमेळ्यासाठी गेलेल्या ८३ भाविकांपैकी केवळ ६१ भाविकांचीच माहिती मिळाली आहे. तर २२ जणांची माहिती मिळालेली नाही. त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, माहिती मिळालेल्या ६१ भाविकांपैकी ६० जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉझिटिव्ह सापडलेल्या ६० पैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय ५५ संशयितांना होम क्वारेंटाइन करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेवून आहोत. कारण जर त्यांने वेळीच विलगीकरणात ठेवले नाही तर ते सुपर स्प्रेडर बनतील. 

हरिद्वारमध्ये आयोजित कुंभमेळ्यादरम्यान अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत होते. तसेच यादरम्यान अनेक साधू संतांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे जसजसे हे साधुसंत माघारी परततील तसतसा कोरोनाचा धोका अधिकाधिक वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतKumbh Melaकुंभ मेळाMadhya Pradeshमध्य प्रदेश