शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: धक्कादायक! विमानतळावर निगेटिव्ह, पण प्रवासादरम्यान हवेतच झाला ५२ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 12:23 IST

coronavirus in India : कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे विमानसेवा मर्यादित झाली असून, तपासणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यानंतरच प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जात आहे. मात्र असे असले तरी विमान प्रवासादरम्यानही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केले आहे. मास्क वापरणे आणि बाधित व्यक्तीपासून दूर राहणे हाच सध्यातरी उपाय दिसत आहे. (coronavirus in India ) कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे विमानसेवा मर्यादित झाली असून, तपासणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यानंतरच प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जात आहे. मात्र असे असले तरी विमान प्रवासादरम्यानही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील विमानतळावर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून हाँगकाँगसाठी ११८ प्रवासी रवाना झाले होते. मात्र नऊ तासांच्या या प्रवासादरम्यान, तब्बल २२ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. (Covid-19 Negative at the airport, but 52 passengers were infected with corona in the air during the journey)

४ एप्रिल रोजी विस्तारा फ्लाइटमधून ११८ प्रवासी दिल्लीतून हाँगकाँगसाठी रवाना झाले होते. विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी या सर्वांचे कोरोना रिपोर्ट तपासण्यात आले होते. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दिसून आले होते. मात्र विमानाने दिल्लीतून हाँगकाँगसाठी उड्डाण केल्यावर ९ तासांनी ते हाँगकाँगला पोहोचले. तिथे या प्रवाशांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली असता ५२ प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 

दरम्यान, भारतातून हाँगकाँगला पोहोचलेले ५२ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाची माहिती ही ७२ तासांनंतर होते. त्यामुळे केवळ ९ तासांच्या प्रवासात सर्व प्रवासी कोरोनाबाधित कसे झाले हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAirportविमानतळ