शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पंतप्रधानांकडून लॉकडाऊननंतरची तयारी; 'त्या' दोन खास अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 09:29 IST

पंतप्रधान कार्यालयातल्या दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडे खास जबाबदाऱ्या

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अतिशय गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे मोदी सरकारनं लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विश्वासातल्या अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांना इतर मंत्रालयांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. लॉकडाऊननंतर मदतकार्यात काहीही त्रुटी राहू नये यासाठी सरकार कामाला लागलं आहे. पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या तरुण बजाज यांना आर्थिक गोष्टींशी संबंधित मंत्रालयात सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर पंतप्रधान कार्यालयातले दुसरे अधिकारी ए. के. शर्मा यांना लघु उद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. लॉकडाऊननंतरच्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीशी दोन हात करण्यात या दोन्ही मंत्रालयांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.ए. के. शर्मा २००१ पासून मोदींसोबत काम करत आहे. सध्याच्या घडीला ते मोदींचे सर्वात जुने सहकारी आहेत. मध्यम आणि लघु उद्योगांसाठी लवकरच मोठं पॅकेज देण्यात येणार असल्याचे संकेत मोदींनी काही दिवसांपूर्वीच दिले. हे पॅकेज लागू करण्याची जबाबदारी ए. के. शर्मा यांच्याकडे दिली जाऊ शकते. तर संपूर्ण पॅकेजच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची कामगिरी तरुण बजाज पार पाडतील.  कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आरोग्य सचिव प्रिती सुदन यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे. सुदन ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार होत्या. मात्र त्यांची निवृत्ती ३ महिने पुढे ढकलली गेली आहे. तर ग्रामीण विकास सचिव राजेश भूषण यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सचिव स्तरावरील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे सुदन यांच्यानंतर भूषण त्यांच्याकडेच आरोग्य सचिवपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे.लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार 'गाड्या सोडा, बसेस लावा पण त्यांची व्यवस्था करा', शिवसेनेचा सरकारला सल्लाकोरोनामुळे महाराष्ट्रासह सहा राज्ये लॉकडाऊन वाढविण्यास सहमत?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी