शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus: कोरोना व्हायरस २८ दिवस डीप फ्रिजरमध्ये जिवंत राहू शकतो, असे राहा सतर्क...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:34 IST

Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान सर्वसामान्य लोकांसह अनेक दुकानदार फ्रिज किंवा डीप फ्रिजरचा वापर करत आहे.

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस  कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये डॉकडाऊन सुरु आहे.

या लॉकडाऊनदरम्यान सर्वसामान्य लोकांसह अनेक दुकानदार फ्रिज किंवा डीप फ्रिजरचा वापर करत आहे. मात्र, संशोधकांच्या मते फ्रिज कोरोना व्हायरससाठी आरामदायक जागा ठरु शकते.

गार्डियनच्या माहितीनुसार, फ्रिज आणि डीप फ्रिजर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन अमेरिकेतील ग्लॅडस्टोन  इंस्टिट्युटने लोकांना आवाहन केले आहे. तसेच, त्यामध्ये ठेवण्यात आलेले सामान सुद्धा दोनवेळा साफ करण्यास सांगितले आहे. कारण, यामुळे व्हायसरचे संक्रमण पूर्णपणे नष्ट होते.  

संशोधकांचा इशारा...कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत जगभरातील लोक खाद्यपदार्थ जास्त काळ टिकून राहावे किंवा खराब होऊ नये म्हणून डीप फ्रिजरमध्ये ठेवत आहेत. गार्डियनच्या माहितीनुसार, सामान्यरित्या लोक फ्रिज आणि डीप फ्रिजरला सुरक्षित मानतात. मात्र, अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजीने वर्ष २०१० मध्ये सार्स व्हायरसवर केलेल्या संशोधनाच्या आधारे मोठा इशारा दिला आहे.

सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या माहितीनुसार, सार्स व्हायरस आणि कोरोना व्हायरस एकसारखाच आहे. कोरोना व्हायरस डीप फ्रीजरमध्ये २८ दिवस जिवंत राहू शकतो. म्हणजेच, चार आठवडे कोरोना व्हायरस फ्रिजरमध्ये जिवंत राहू शकतो. ग्लॅडस्टोन  इंस्टिट्युट डॉ. वार्नर ग्रीन यांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल, तर डीप फ्रीजरमध्ये ठेवलेले साहित्य सॅनिटाइज करा. तसेच, डीप फ्रीजर स्वच्छ ठेवा आणि स्वत:ही स्वच्छ राहा.

ऑनलाइन शॉपिंग करतानाही काळजी घ्या...अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना घरपोच साहित्य पोहोचविण्यासाठी ऑनलाइन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन कंपन्या आपल्यामार्फत स्वच्छता ठेवण्याचे काम करत आहे. मात्र, हे साहित्य घेताना आणि ठेवताना विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे कोरोनाचे संक्रमण टाळता येऊ शकते.

यासाठी काय करावे...- साहित्याची घरात डायरेक्ट डिलिव्हरी करू नये, ते एखाद्या जागेवर ठेवावे आणि त्यावर सुरक्षात्मक उपाय करूनच घरात घ्यावे.- आपले हात २० सेंकदापर्यंत साबण लावून स्वच्छ धुवावे.- साहित्याला सॅनिटाइज करा. एका स्वच्छ कपड्याने सॅनिटाइज घेऊन साहित्य चांगल्याप्रकारे साफ करा.- काही सेकंदापर्यंत सॅनिटायझर साहित्यावर राहू द्या, त्यानंतर गरम पाण्याने धुतलेल्या कपड्याने साहित्य साफ करून घ्या.- यानंतर साहित्य रॅकवर ठेवा अथवा फ्रिज किंवा डीफ फ्रिजरमध्ये ठेवा.- डीप फ्रिजर सुद्धा क्लिनरने साफ करा, यासाठी ब्लीचचा वापर करू शकता.- फ्रिज आणि डीप फ्रिजर दररोज साफ करा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स