शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाला हरवण्यात राजस्थान आघाडीवर; ४७ टक्के रुग्ण बरे, ५ जिल्हे संक्रमणमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 14:33 IST

CoronaVirus in Marathi News and Live Updates : राजस्थानात 5 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. चुरू, झुंझुनू, सवाई माधोपूर, करौली आणि हनुमानगड या जिल्ह्यांत एकही कोरोनाची रुग्ण आढळला नाही.

ठळक मुद्देनागौर आणि अजमेरमधील कोरोनीची स्थिती सुधारत आहे. नागौरमध्ये 119 पैकी 66 रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत. तर अजमेरमध्ये 181 पैकी 130 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

जयपूर : देशासमोर कोरोना व्हायरसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी विविध राज्यांत सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. दरम्यान,  कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्यांपैकी राजस्थानमधील रूग्ण वेगाने बरे होत आहेत. 

राजस्थानमध्ये जवळपास 47.4% रुग्ण बरे झाले आहेत. दुसऱ्या स्थानकांवर तामिळनाडू असून येथील कोरोनाचे 39.69% रुग्ण बरे झाले आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशातील रुग्ण बरे होत आहेत. 31.76% रुग्ण आंध्र प्रदेशात झाले आहे. तर मध्य प्रदेश 29.1 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.राजस्थानमध्ये 22 एप्रिलपर्यंत एकूण 1517 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 6 मे पर्यंत फक्त1614 अॅक्टिव्ह (जे रूग्णालयात दाखल आहेत) आहेत. बाकीचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 15 दिवसांत केवळ 97 रुग्ण वाढले आहेत. 

राजस्थानात 5 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. चुरू, झुंझुनू, सवाई माधोपूर, करौली आणि हनुमानगड या जिल्ह्यांत एकही कोरोनाची रुग्ण आढळला नाही. तर नागौर आणि अजमेरमधील कोरोनीची स्थिती सुधारत आहे. नागौरमध्ये 119 पैकी 66 रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत. तर अजमेरमध्ये 181 पैकी 130 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या दोन ठिकाणी हॉट स्पॉट जिल्ह्यांमधील रिकव्हरीचा दर सर्वात कमी आहे.

दरम्यान, बुधवारी राज्यात जयपूर, जोधपूर, सवाईमाधेपूर आणि करळी येथे प्रत्येकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तर 159 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत राज्यात एकूण 3317 कोरोनाचे रुग्ण आहे. तर 93 जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या