शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आधीच अडचणीत असलेल्या जनतेकडून पीएम केअरसाठी होतेय वसुली, प्रियंका गांधींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:53 IST

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहेप्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहेअशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे फार हाल होत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान, सर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहे, अशा काळात प्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यात त्या म्हणतात की,’ एक सल्ला: जेव्हा जनता त्रस्त आहे, अन्न, पाणी, रोख रकमेची टंचाई आहे. अशा काळात सरकारी वर्गाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली. अशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल,’

या ट्विटमधून प्रिकंका गांधी यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. ‘देशातून पळालेल्या बँक चोरांचे ६८ हजार कोटी रुपये माफ करण्यात आले आहे. त्याचा हिशोब झाला पाहिजे. संकटकाळात जनतेसमोर पारदर्शकपणे कारभार होणे गरजेचे आहे. यामध्ये जनता आणि सरकार दोघांचेही हित आहे.’ असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार