शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

Coronavirus: विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांच्या भाड्यावरून राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 02:34 IST

काँग्रेस : आम्ही पैसे देऊ, रेल्वे : ८५ टक्के खर्च आम्ही सोसतोय

नवी दिल्ली : ‘लॉकडाउन’मुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या परराज्यांमधील लाखो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात नेऊन पोहोचविण्यासाठी रेल्वेतर्फे चालविल्या जात असलेल्या विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांसाठी मुळात भाडे आकारले जाणे आणि ते कोणी भरायचे, यावरून सोमवारी बरीच गरमागरमी होऊन वातावरण चांगलेच तापले.

या गाड्या सोडण्याविषयी रेल्वेने २ मे रोजी राज्यांकडे जे ‘स्टॅँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’चे (एसओपी) पत्र पाठविले त्यावरून या वादाला सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी व पक्ष सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी यावरून केंद्र सरकार व रेल्वेवर सडकून टीका केली. तसेच घरी परतू इच्छिणाऱ्या सर्व गरजू स्थलांतरित कामगारांचे रेल्वेचे प्रवास भाडे त्या त्या राज्यातील प्रदेश काँग्रेस समिती भरण्यास तयार आहे, असेही पक्षाने जाहीर केले. काँग्रेसचे म्हणणे असे होते की, रेल्वेने पंतप्रधानांच्या ‘पीएम केअर्स फंडा’साठी एकीकडे १९४ कोटी रुपये द्यावेत व दुसरीकडे या मजुरांच्या वाहतुकीसाठी भाडे आकारणी करावी, हेच मुळात अनाकलनीय गौडबंगाल आहे. परदेशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सरकारने तेथून विमाने फुकट मायदेशी परत आणले होते. त्यामुळे या मजुरांच्या प्रवासभाड्याचा खर्चही केंद्र सरकारनेच करायला हवा. रोजगाराअभावी अन्नान्न दशा झालेल्या या मजुरांना प्रवासाचे पैसे भरायला लावणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे.

यावर प्रति टोला लगावताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेसची अवस्था ‘बुडत्याला काडीचा आधार’, अशी झाली आहे. काँग्रेसने अशी बिनबुडाची टीका करण्याऐवजी आधी गृहपाठ करावा. या मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था रेल्वे ८५ टक्के कमी भाडे आकारून करीत आहे. बाकीचा १५ टक्के राज्यांनी करायचा आहे. भाजपची सत्ता असलेली राज्ये आपापल्या नागरिकांसाठी असा खर्च करीत आहेत. काँँग्रेसने आपल्या राज्य सरकारांनाही तसे करण्यास सांगावे.

दुपारनंतर रेल्वेही या वादात उतरली. आपली भूमिका स्पष्ट करताना रेल्वेच्या अधिकृत प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, इतर सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असूनही राज्यांच्या विनंतीवरून आम्ही या विशेष गाड्या चालवत आहोत. या गाड्यांमधून नेहमीच्या क्षमतेहून निम्म्यापेक्षाही प्रवासी नेले जातात. गाडीत वैद्यकीय पथक, रेल्वे सुरक्षा दलाचे पथक व पाणी तसेच जेवणाखाण्याची व्यवस्था करावी लागते. शिवाय येताना या गाड्या पूर्णपणे रिकाम्या परत आणाव्या लागतात. असे असूनही प्रत्येक गाडी चालविण्यासाठी जो किमान खर्च येतो त्याचा ८५ टक्के भार आम्ही सोसत आहोत. प्रवासी मजुरांना पाठविणाºया राज्यांनी राहिलेली १५ टक्के रक्कम भरली की त्यांना गाडीतून जाणाºया सर्वांची तिकिटे दिली जातील, असे त्यांना सांगण्यात आले आहे. ही रक्कम स्वत: भरायची, जाणाºया मजुरांकडून वसूल करायची की ते ज्या राज्यांत जाणार आहेत तेथील सरकारकडून घ्यायची, हे ज्या त्या राज्याने ठरवायचे आहे.

३४ विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाड्याआतापर्यंत विविध ठिकाणांहून अशा ३४ विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. ‘एसओपी’चे पत्र २ मे रोजी दुपारनंतर पाठविण्यात आले. त्याआधी ज्या गाड्या रवाना झाल्या त्यांचे कोणतेही भाडे कोणाहीकडून घेण्यात आले नव्हते; परंतु पूर्णपणे मोफत सेवा ठेवली तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊन गोंधळ होईल. त्यामुळे जे खरंच अडकलेले आहेत व ज्यांना परतणे निकडीचे आहे अशाच लोकांनी या सेवाचा लाभ घ्यावा, या उद्देशाने १५% भाडेआकारणी करण्याचा निर्णय घेतला, असेही रेल्वेने सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या