शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

PM मोदींनी सहकार्याबद्दल मानले पुतीन यांचे आभार, दोन्ही नेत्यांत 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:25 IST

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (PM Narendra Modi)

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रोजच्या रोज लाखो रुग्ण समोर येत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यादरम्यान कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीवर दोन्ही देशांच्या राष्ट्र प्रमुखांनी चर्चा केली. (CoronaVirus PM Narendra Modi and Russian president Vladimir Putin talks on phone amid rising corona cases)

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "माझे मित्र राष्ट्रपती पुतीन यांच्याशी आज चांगली चर्चा झाली. आम्ही कोरोनाचा सामना करण्यासंदर्भात चर्चा केली. कोरोना महामारीविरोधातील लढाईत भारताची मदत केल्याबद्दल मी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे आभार मानतो."

Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर

मोदी म्हणाले, आम्ही विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य, विशेषतः हायड्रोजन इकॉनॉमीसह अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रावर चर्चा केली. स्पुतनिक-V लशीचे सहकार्य कोरोना महामारीविरोधात मानवतेच्या संघर्षात उपयोगी पडेल.

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 60 हजार 960 नवे रुग्ण - देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करेले जात आहेत. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित सापडतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3 लाख 60 हजार 960 नवे रुग्ण आढळले आहेत. याच बरोबर एका दिवसात कोरोनामुळे तब्बल 3 हजार 293 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,61,162 लोक कोरोनामुक्तही झाले आहेत. यापूर्वी सोमवारी देशात 323,023 नवे कोरोनाबाधित आढळले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी