शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...हा तर औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान; ओवेसी पंतप्रधान मोदींवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 10:05 IST

Coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीवरुन टीकास्त्र

हैदराबाद: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी देशातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र या चर्चेसाठी मला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. हा हैदराबाद आणि औरंगाबादचा अपमान असल्याचं ओवेसींनी म्हटलंय.पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका ओवेसींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 'औरंगाबाद आणि हैदराबादकरांनी एमआयएमला पसंती दिली म्हणजे ते माणूस म्हणून कमी महत्त्वाचे आहेत का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, यामागचं नेमकं कारण काय? आमच्या लोकांच्या व्यथा, मग त्या आर्थिक दृष्टीकोनातून असोत वा मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे,' असं ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटलं असून त्यात पंतप्रधान कार्यालयाला टॅगदेखील केलंय. हैदराबाद आणि औरंगाबादच्या जनतेनं अनुक्रमे माझी आणि इम्तियाज जलील यांची निवड केली. आम्ही त्यांचे प्रश्न, समस्या मांडू यासाठी त्यांनी आम्हाला निवडून दिलं. मात्र आता आम्हाला त्यांच्या समस्याच मांडता येत नाहीत. हैदराबादमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण आढळून आले आहेत. या संकटाचा सामना कसा सामना कसा करायचा, ज्या भागांमध्ये आपण कमी पडतोय, तिथे काय करायचं, याबद्दलच्या काही संकल्पना मला मांडायच्या होत्या, असंदेखील ओवेसींनी पुढे म्हटलं. असदुद्दीन ओवेसींनी त्यांच्या ट्विटसोबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयाचं पत्र जोडलंय. पंतप्रधान राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचा उल्लेख यात आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून पाचपेक्षा अधिक सदस्य असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मोदी संवाद साधतील, असं यात नमूद करण्यात आलंय. एमआयएमचे लोकसभेत दोन सदस्य असून राज्यसभेत एकही प्रतिनिधी नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद