शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: अडीच तास होऊन गेले, पण मजुरांचा तपशील मिळेना; रेल्वेमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 22:59 IST

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर; तीन तासांमध्ये पाच ट्विट्स

मुंबई: मजुरांना घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्या पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्याकडे मजुरांची यादी तयारी आहे. पण ट्रेनच मिळत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे केंद्रावर निशाणा साधला. त्याला आता रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोयल यांनी गेल्या ३ तासांमध्ये ५ ट्विट्स केली आहेत. राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी दररोज ८० रेल्वे गाड्या हव्या आहेत. मात्र आम्हाला केवळ ३० ते ४० गाड्याच दिल्या जात आहेत. आमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. पण गाड्याच उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पलटवार केला. 'उद्या आम्ही महाराष्ट्राला १२५ श्रमिक विशेष गाड्या देण्यास तयार आहोत. तुमच्याकडे मजुरांची यादी तयार असल्याचं तुम्ही म्हणालात. त्यामुळे गाड्या कुठून सोडायच्या आहेत, रेल्वे गाड्यांनुसार प्रवाशांची यादी, त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रं आणि रेल्वे कुठे सोडायच्या आहेत, याची माहिती पुढील तासाभरात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कळवा,' असं आवाहन गोयल यांनी केलं होतं. मजुरांची आवश्यक माहिती लवकर द्या. त्यामुळे रेल्वे गाड्या रिकाम्या जाणार नाहीत, असा खोचक टोला रेल्वेमंत्र्यांनी ट्विटमधून लगावला. तुम्हाला जितक्या रेल्वे गाड्या हव्या आहेत, तितक्या उपलब्ध करून दिल्या जातील, असंदेखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यानंतर जवळपास दीड तासानंतर पियूष गोयल यांनी आणखी एक ट्विट केलं. राज्यातील मजुरांसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यानंतर अर्ध्या तासानं त्यांनी पुन्हा ट्विट केलं. 'अडीच तास होऊन गेले. मात्र तरीही महाराष्ट्र सरकारकडून १२५ गाड्यांसाठी आवश्यक तपशील मिळालेला नाही', असं गोयल यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांचं रेल्वेमंत्र्यांना प्रत्युत्तरमहाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी,  फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्याना प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांना फडणवीसांचं प्रत्युत्तरस्वत:चं अपयश लपवण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणं, याला काय म्हणायचं? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे. सूचनांना राजकारण समजायचं असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावं. जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे!- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेpiyush goyalपीयुष गोयल