शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी रुग्ण लाखावर? जागतिक यादीत भारत चीनला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:12 IST

भारत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्येसह जागतिक यादीत बाराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ८ मे रोजी ६० हजार रुग्णसंख्या गाठणाऱ्या भारतात ७० हजारांच्या आकड्यासाठी केवळ ३ दिवस लागले.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या जागतिक यादीत लवकरच भारत चीनला मागे टाकण्याची भीती आहे. मे महिन्यात कोरोनाची संख्या सातत्याने वाढते आहे. देशव्यापी लॉकडाऊन असले तरी देशात दहा हजार रुग्ण समोर येण्यासाठी सरासरी ३ ते ४ दिवसांचा कालावधी १० मेनंतर लागतो आहे. जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून, चीन ११ व्या क्रमांकावरआहे.भारत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्येसह जागतिक यादीत बाराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ८ मे रोजी ६० हजार रुग्णसंख्या गाठणाऱ्या भारतात ७० हजारांच्या आकड्यासाठी केवळ ३ दिवस लागले. भारतच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता त्यामुळे वाढली आहे. एकीकडे अर्थव्यवस्था हादरली असताना कोरोनाचा प्रसार थांबण्याची चिन्हे नाहीत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपताना भारतात १ लाखापेक्षा जास्त रुग्ण असतील, असा अंदाज दररोजच्या आकडेवारीवरून काढण्यात आलाय. अर्थात, एकूण रुग्ण १ लाखांवर गेले तरी त्यातील बरे झालेल्या २६ हजार ५६४ जणांना वगळण्यात येईल. मृत्यू झालेल्यांची संख्या २,५६४ इतकी आहे. त्यामुळे सध्या भारतात ७२ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढलीमे महिन्यात दररोज बरे होणाऱ्यांपेक्षा दुप्पट नवे रुग्ण समोर येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी नव्या रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे.10 देशांमध्ये रुग्णसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. चीन ८२ हजार ९२९ रुग्णांसह अकराव्या, तर भारत ७८ हजार ८१० रुग्णांसह बाराव्या क्रमांकावर आहे. पुढच्या दोन दिवसांत भारत चीनला मागे सारून टॉप टेनमध्ये जाईल, अशी भीती वर्तवली जात आहे.बरे होणाºयांचा आलेख वाढवून नव्या रुग्णांचा आलेख आधी समांतर व नंतर कमी करण्यासाठी आता आरोग्य मंत्रालयात युद्धपातळीवर बैठका होत आहेत.1411 लोकांची दर दहा लाखांमागे भारतात होत आहे चाचणी. अमेरिकेत हे प्रमाण ३१ हजार २७ आहे. इराणदेखील चाचण्यांमध्ये भारतापेक्षा पुढे आहे. तेथे दहा लाख लोकांसाठी ७ हजार ६६५ जणांची चाचणी करण्यात येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत