शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

रात्रभर १० रुग्णालयं फिरले, कुठेच मिळाला नाही बेड; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हातही जोडले, मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:26 IST

Coronavirus patient die : ''रात्रभर फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यानं आम्ही सकाळी मुख्यंमंत्र्यांच्या घराबाहेर पोहोचलो.''

कर्नाटक सरकार राज्यभरात आरोग्य सेवा व्यवस्थित, पुरेश्या असल्याचा दावा करीत आहे. बेड्सची कमतरता नसल्याचाही दावा केला जात आहे, परंतु वास्तव काही वेगळेच आहे. बंगळुरूमध्ये एका कोरोना रूग्णाचे कुटुंबिय त्याला दाखल करण्यासाठी एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयामध्ये भटकत होते. काहीही केल्या त्यांना बेड मिळत नवह्ता. 10 हून अधिक रुग्णालयांनी त्याला परत पाठवले. निराश होऊन हे कुटुंब मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना भेटायला बाहेर गेलं. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली पण वाटेतच रुग्णाचा मृत्यू झाला. 

बेंगलुरू बाहेरील रामोहल्ली येथे राहणारे सतीश (वय 45) याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांची पत्नी मंजुलता यांनी सतीश  यांना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. पण बेड नसल्याचं सांगत त्यांना परत पाठवण्यात आले.  मंजुलता म्हणतात  की, ''दहा रुग्णालयांमध्ये विचारण्या केल्यानंतर बेड मिळाली नाही.  त्यावेळी आम्हाला एकच मार्ग दिसला. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यासाठी त्यांच्या घरा बाहेर गेलो.'' मुख्यंमंत्र्याचे निवास कावेरीसमोर पोलिस दलाने मंजुलता यांना अडवले.

हात जोडून विनवणी केली

मंजुलता या हात जोडून ती पोलिसांना सांगत राहिल्या,  ''माझ्या पतीच्या उपचाराचा सर्व खर्च मी उचलणार आहे. माझ्यासाठी फक्त एका आयसीयू बेडची व्यवस्था करा जेणेकरून माझ्या पतीवर उपचार केले जाऊ शकतात. त्यानंतर एमएस रामा हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली. '' ही महिला पतीसमवेत रुग्णालयाच्या दिशेने गेली, पण तिचा पती वाटेतच मरण पावला.  कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

रात्री १ वाजल्यापासून शोधत होते बेड

मंजुलता यांनी सांगितले की, '' माझे पती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते. रात्री १ वाजेपासून बेड शोधायला सुरूवात केली होती. माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळताच आम्ही सगळे होम आयसोलेशनमध्ये होतो. त्यांची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे रुग्णवाहिका तातडीनं बोलावण्यात आली. माझे  दोन भाऊ आणि कुटुंबातील इतर लोक बेड शोधण्याचा प्रयत्न करत होते. रात्रभर फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यानं आम्ही सकाळी मुख्यंमंत्र्यांच्या घराबाहेर पोहोचलो.'' अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार  

टॅग्स :Karnatakकर्नाटकSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यू