शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

तिसऱ्या लाटेपूर्वीच 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या पालकांना टोचली जाणार लस; असा आहे योगींचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 18:05 IST

उत्तर प्रदेश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार आहे. आपण सर्वांनीच ट्रेस आणि टेस्टच्या माध्यमाने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोंडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी, देवीपाटनमधील जिल्ह्यांच्या समीक्षेसोबतच येथील कोविड कमाण्ड सेंटर, कोविड हास्पिटलचेही निरीक्षण केले. याच बरोबर त्यांनी गहू खरेदी केंद्राचीही माहिती घेतली. यावेळी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर भाष्य करताना, ही लाट येण्यापूर्वीच विशेष अभियान राबवून 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या पालकांचे लसीकरण करण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. (Parents of children under 12 years of age will be vaccinated before the third wave said Yogi Adityanath)

मुख्यमंत्री योगी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, देशभरात  कोरोनाविरोधात पंतप्रधानांच्या नेतृत्वात जी लढाई सुरू झाली, आता त्याचे चांगले परिणाम येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार आहे. आपण सर्वांनीच ट्रेस आणि टेस्टच्या माध्यमाने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. आता राज्यात रोज तीन लाखहून अधिक टेस्ट होत आहेत.

योगी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्यातील 36 जिह्यांत एकही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड नव्हता. आजच्या स्थितीत सर्वच जिल्ह्यांत ऑक्सिजन आणि व्हेटिलेटर आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुले संपूर्ण राज्यात 80 हजार व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. ते म्हणाले, तिसरी लाट येण्यापूर्वीच प्रत्येक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला 100 बेड अतिरिक्त उपलब्ध करून दिले जातील. तसेच यावेळी त्यांनी लोक प्रतिनिधींना आपल्या भागातील कोरोना रुग्णालयांना दत्तक घेण्याचेही निर्देश दिले आहेत.

याच बरोबर, व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमाने, बहराइच, बलरामपूर आणि श्रावस्ती येथील जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोरोना स्थितीचा आढावा घेत, कोरोना टेस्टिंगदर आणि लसीकरणाचा वेग वाढवावा, असे निर्देशही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस