शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus पाकिस्तान बेछुट गोळ्या झाडतोय; तरीही भारत त्यांच्या नागरिकांना मदत करतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 08:20 IST

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे.

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनामुळे भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश त्रस्त असताना पाकिस्तान सीमेपलिकडून भारतावर गोळीबार करण्यामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या देशांत अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाहीय. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात लोकांमध्ये कमालीचा राग आहे. अशातच भारतामध्ये अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची तयारी भारताने सुरु करून माणुसकीचा नवा आदर्श जगसमोर ठेवला आहे. 

पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. अशातच परदेशांमध्ये लाखावर पाकिस्तानी नागरिक अडकून पडलेले आहेत. या नागरिकांनाही देशात आणण्याचे सौजन्य इम्रान सरकार दाखवत नाहीय. भारतामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या १८० पाकिस्तानी नागरिकांनाही पाकिस्तानने वाऱ्यावर सोडले आहे. यावर पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताकडेच मदत करण्याची विनवणी केली आहे. 

यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने माणुसकीच्या नात्यातून या लोकांना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुरखोरी करत आहे. गेल्याच आठवड्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये ५ भारतीय पॅरा ट्रूपर्सही होते. एवढे असूनही भारत पाकिस्तानची मदत करत आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताला सांगितले आहे की, अडकलेले नागरिक पाकिस्तानात येऊ पाहत आहेत. सुत्रांनी सांगितले की, आम्हाला पाकिस्तानी उच्चायोगाकडून माहिती मिळाली आहे की त्यांचे १८० नागरिक आजही भारतात आहेत. त्याना माघारी यायचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या परत जाण्यासाठी चर्चा सुरू असून गेल्या महिन्यात पाच पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानIndiaभारतCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनJammu Kashmirजम्मू-काश्मीर