शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 09:33 IST

Coronavirus : कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मल सिंह यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं.

चंदिगड - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 1900 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 58 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने असंख्य बळी घेतले आहे. याच दरम्यान पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आणि सुवर्ण मंदिराचे माजी 'हजूरी रागी' निर्मल सिंह यांचा गुरुवारी (2 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2009 मध्ये निर्मल सिंह यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.परदेशातून परतल्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मल सिंह यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं.

गुरु नानक देव रुग्णालयाचे सर्जन प्रभदीप कौर जौहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय निर्मल सिंह यांना त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतान त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अस्थमामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि गुरुवारी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. भारतातील  कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील 24 तासांत 400 ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात 1900 रुग्ण आणि 58 बळी आहेत. मागील 24 तासांत 132 जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. 

देशात कोरोनाची संख्या वाढत असताना हरियाणाच्या गुरुग्राममध्ये दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची लागण झालेल्या 10 रुग्णांपैकी 9 जण बरे झाले आहेत. या पैकी काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. घरी सोडण्यात आलेल्या व्यक्तींना डॉक्टरांनी काही दिवस विलग राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच बुधवारी ( 1 एप्रिल) हरियाणामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सुरुवातीला गुरुग्राममध्ये 10 करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता 9 जणांची प्रकृती ठिक असून ते बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

coronavirus : पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी?

Coronavirus: कोरोना विषाणूचे भारतात २४ तासांत ४०० नवे रुग्ण; १३२ जण झाले बरे; एकूण ५८ जणांचा मृत्यू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबIndiaभारतDeathमृत्यू