शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:55 IST

Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,26,720 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,26,720 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,999,279 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11,000 हून अधिक झाली असून आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात 4,78,932 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात एका दिवसात 141 हून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील 15 राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तसेच कोरोनाविरोधात भारत लढत आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 

अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 26,047 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 613,886 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय

CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप

राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू