शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जगात भारी, भारतीयांची बातच न्यारी! 'ही' आकडेवारी देशाला सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 08:53 IST

CoronaVirus News: भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्याचं सीरो सर्वेक्षणांमधून समोर

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा २७ लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. देशाच्या शहरांमधील महापालिका आणि काही प्रमुख संशोधन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून एक अतिशय दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील एक चतुर्थांश व्यक्तींच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.पुण्यातील काही भागांमधील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याची आकडेवारी दोनच दिवसांपूर्वी समोर आली. याशिवाय मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरातही सीरो-पॉझिटिव्हिटी दिसून आली. दिल्लीतही नुकतंच सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात २३ टक्के व्यक्ती सीरो-पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. दिल्लीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या सीरो सर्वेक्षणाचा अहवाल याच आठवड्यात येणार आहे.शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी कोरोनापासून बचाव करतात. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून येतात. मात्र या अँटीबॉडीमुळे किती काळ कोरोनापासून बचाव होतो, याबद्दल अद्याप तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. 'काही भागांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सीरो-पॉझिटिव्हिटी असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असल्याचं दिसून येतं,' अशी माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशींनी दिली.देशभरात थायरोकेअर लॅबोरेटरीकडून अँटीबॉडी टेस्ट केल्या जात आहेत. विविध भागांमध्ये चाचण्या घेऊन व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासल्या जात आहेत. 'देशात आतापर्यंत २ लाख लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातल्या जवळपास २४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा सामना करू शकणाऱ्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. दिल्लीत २९ टक्के, तर महाराष्ट्रात २७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. ठाण्यातील एक तृतीयांश, तर नवी मुंबईतील २१ टक्के नागरिक सीरो-पॉझिटिव्ह आहेत,' अशी आकडेवारी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक अरोकियास्‍वामी वेलुमणी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या