शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

Coronavirus: ओमायक्रॉन विषाणूची धडकी! संपर्कात आलेल्यांचा शोध देशभर वेगाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:23 IST

Coronavirus in India : omicron variant देशात हातपाय पसरु लागला आहे. या नव्या विषाणूच्या १२ संशयास्पद रुग्णांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

 नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणू देशात हातपाय पसरु लागला आहे. या नव्या विषाणूच्या १२ संशयास्पद रुग्णांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.आफ्रिकेतून आलेल्यांपैकी १० जण बंगळुरूमध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचे फोनही बंद असल्याने हे दहा जण दडून बसले असण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रातही विदेशातून आलेल्या १२ रुग्णांना कोरोनाची बाधा होती. परंतु तपासणीअंती ते ओमायक्रॉन निगेटिव्ह  निघाले. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात गुरुवारी ओमायक्राॅनच्या आठ संशयास्पद रुग्णांना दाखल करण्यात आले. तर आणखी चार जणांवर शुक्रवारपासून उपचार सुरू झाले. त्यापैकी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतर दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल लवकरच हाती येतील.

कर्नाटकातील एक रुग्ण ६६ वर्षे वयाचा असून तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तो आपल्या मायदेशात परत गेला. दुसरा रुग्ण ४६ वर्षे वयाचा आहे. त्याने गेल्या काही महिन्यांत कुठेही प्रवास केलेला नाही. शुक्रवारी दाखल केलेल्या चार रुग्णांपैकी दोन जण ब्रिटनहून, एक जण फ्रान्स व आणखी एक नेदरलँँडहून आले आहेत. या चौघांचे चाचणी नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. कर्नाटकमध्ये दोन रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी गुरुवारी जाहीर केले होते.

नव्या विषाणूवर कोव्हॅक्सिन प्रभावी?नवी दिल्ली : भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस देशात सध्या उपलब्ध असलेल्या इतर लसींपेक्षा ओमायक्रॉनच्या संसर्गावर अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.

डेल्टापेक्षा याच्या संसर्गाचा वेग अधिक ओमायक्रॉनमध्ये कोरोनाच्या कोणत्याही इतर विषाणूपेक्षा अधिक परिवर्तने झाल्याचे आढळले आहे. तसेच त्याच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षाही अधिक आहे. ओमायक्राॅन हा नवा विषाणू सापडल्याची जागतिक आरोग्य संघटनेने २६ नोव्हेंबर रोजी घोषणा केली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारतHealthआरोग्य