शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
3
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
4
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
5
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
6
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
7
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
9
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
10
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
11
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
12
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
13
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
14
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
15
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
16
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
17
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
18
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

Omicron Variant : भारतातील 'त्या' संक्रमित डॉक्टरांनी स्वतःच सांगितली ओमायक्रॉनची लक्षणं, 'गुड न्यूज'ही दिली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 14:32 IST

डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे.

बेंगळुरू - भारतात ओमायक्रॉन या कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिअंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉन भारतातही येऊन धडकला आहे. या आठवड्यात कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले. यांपैकी एक 46 वर्षीय डॉक्टर आहे. मात्र संक्रमित डॉक्टर आता ठीक आहे. त्यांनी स्वत:च सांगितले, की त्यांना कुठलाही अधिक त्रास नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला हा नवा व्हेरिअंट अतिशय धोकादायक असून तो अत्यंत वेगाने पसरतो, असे बोलले जात आहे. अशा स्थितीत त्याची लक्षणेही वेगळी आहेत का? असा प्रश्नही केला जात आहे. बघुया, यासंदर्भात खुद्द संसर्ग झालेल्या डॉक्टरांनीच काय सांगितले?

संक्रमित डॉक्टरांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले, की आजारापेक्षाही अधिक वेदनादायक गोष्ट म्हणजे घरात बंद राहणे आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे.

काय आहेत ओमायक्रॉनची लक्षणं?ओमाक्रॉनच्या लक्षणांबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांना प्रचंड बॉडी पेन होत होते. याशिवाय त्यांना हलक्या स्वरुपाचा तापही होता, पण श्वास घेण्यास त्रास होत नव्हता. त्याची ऑक्सिजनची पातळीही सातत्याने सामान्य होती. त्यांना 21 नोव्हेंबरपासून ताप जानवू लागला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिले. डॉक्टर म्हणाले, 'मला सर्दी नव्हती. तसेच मला केवळ 100 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत ताप होता.

ओमायक्रॉन संक्रमणात असा केला गेला उपचार -  संक्रमित आढळून आल्यानंतर डॉक्टर पहिल्या दिवशी घरीच थांबले. यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर पुढे म्हणाले, '२५ नोव्हेंबरला मला मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा डोस देण्यात आला. याचा मला प्रचंड फायदा झाला. दुसऱ्या दिवशी माझ्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते. काही दिवसांपूर्वी एका व्हायरोलॉजिस्टने सांगितले होते की, मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा कॉकटेल उपचारांचा ओमायक्रॉनवर फारसा परिणाम होत नाही.

कुटुंबातील सदस्यही संक्रमित -डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र याच दरम्यान पेशाने डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. यानंतर त्यांनी २६ नोव्हेंबरला चाचणी करायचे ठरवले. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली. पण नंतर त्या आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आल्या. तसेच, गुरूवारी जेव्हा डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समजले, तेव्हा त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस