शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

Coronavirus : ओमायक्रॉन भारतात धडकलाच, कर्नाटकात आढळले दोन रुग्ण; एक बाधित दुबईला झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 06:59 IST

Coronavirus, Omaicron verient: संपूर्ण जगात धास्ती निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अखेर भारतात प्रवेश केल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : संपूर्ण जगात धास्ती निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अखेर भारतात प्रवेश केल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले. त्यापैकी एक जण ज्येष्ठ नागरिक असून अन्य एक जण डॉक्टर असल्याचे समजते. दरम्यान, एका बाधिताच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.आतापर्यंत ३० देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून ३० देशांनी आफ्रिकी देशांतून येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत.

कोण आहेत हे रुग्ण, त्यांची स्थिती काय?- एक जण ६६ वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. परंतु लक्षणे नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. परंतु जिनोम सिक्वेंसिंगच्या आधी खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले. - अन्य बाधित डॉक्टर असून त्याला २१नोव्हेंबर रोजी अंगदुखी व ताप असा त्रास जाणवला. त्यास ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील  ५ जणांना कोरोना झाला. सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

३० देशांमध्ये ३७५ रुग्णभारत, अमेरिकेसह ३० देशांमध्ये ओमायक्राॅन विषाणूची बाधा झालेले ३७५ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील आहेत. तेथे १८३ जणांना ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन आफ्रिकी देशांतून येणाऱ्यांसाठी नवी नियमावलीमुंबई : द. आफ्रिका, बोत्स्वाना व झिम्बाब्वे या देशांना अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. ती पाॅझिटिव्ह आल्यास प्रवाशाची रवानगी कोविड सेंटरमध्ये होईल. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही नवी नियमावली जाहीर केली. दरम्यान, नायजेरियातून पुण्यात आलेेले तिघे पॉझिटिव्ह आढळून आले. 

ओमायक्रॉनचे बाधित देशात आढळले म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, यासंदर्भात सावध राहणे आत्यंतिक गरजेचे आहे. कोरोनानियमांचे काटेकोर पालन करा आणि गर्दी टाळा. - लव अग्रवाल, सहसचिव, केंद्रीय आरोग्य मंत्रालय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारत