शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 09:12 IST

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतातील अनेकांची चाचणी निगेटिव्ह आली असून काहींना उपचारानंतर रुग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी देशात सर्वात मोठं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ओडिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंटरुग्णालय उभारणार आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांसाठी सर्वात मोठं रुग्णालय उभारणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. कोरोनाग्रस्तांसाठी हे रुग्णालयात उभारण्यात येत असून यामध्ये तब्बल एक हजार बेडची व्यवस्था असणार आहे. ओडिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून ‘COVID-19 ट्रिटमेंटरुग्णालय उभारले जात आहे. गुरुवारी (26 मार्च) एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुख्‍यमंत्री नवीन पटनायक यांनी याबाबत आदेश दिले आहे. सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे.

 

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निमलष्करी दलाची देशभरातील 32 रुग्णालये सरकारने ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये 1900 खाटा आहेत. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस व सशस्त्र सीमा बलची ही रुग्णालये ग्रेटर नोएडा, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू-तेकानपूर (ग्वाल्हेर), दिमापूर, इम्फाळ, नागपूर, सिल्चर, भोपाळ, आवाडी, जोधपूर, कोलकाता, पुणे व बंगळुरू येथील ही रुग्णालये आहेत.

लष्कर व केंद्रीय निमलष्करी दलाने कोरोनाग्रस्तांसाठी 2000 पेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली आहेतसेच हिमाचल प्रदेशात हमीरपूर जिल्हा प्रशासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील 2000 खोल्या रुग्णांसाठी घेतल्या आहेत. सीमा सुरक्षा करणाऱ्या आयटीबीपीमध्ये तर देशातील सर्वांत मोठे क्वारंटाईन सेंटर चालवले जात आहे. तेथे 1000 जणांची व्यवस्था केली आहे. दरम्यानकेंद्र सरकारने कोरोना व्हायरससंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी एक व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. 9013151515 असा तो नंबर असूनत्यावरील सेवा 24 तास सुरू असेलअसे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?

CoronaVirus : ...फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

Coronavirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

CoronaVirus : कोरोनाचे जगभरात २२ हजारांवर बळी; इटली, स्पेन, चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOdishaओदिशाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूIndiaभारत