शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोनाग्रस्ताचा उद्दामपणा! वेळेत चहा न दिल्यानं लगावली नर्सच्या कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:18 IST

दक्षिण केरळमधल्या कोल्लममध्ये ही घटना घडली असून, आरोपी रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिरुवनंतपूरमः देशात कोरोना व्हायरस ही रोगराई वाऱ्यासारखी पसरते आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. कोरोनाबाधितांना इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी विलगीकरण कक्षा(आयसोलेशन वॉर्ड)त ठेवलं जातं. परंतु या आयसोलेशन वॉर्डात अनेक रुग्ण नर्स आणि वॉर्डबॉयला सहयोग करत नसल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. पहिल्यांदा रुग्ण वॉर्डातून पसार होत होते. पण आता चक्क नर्सवरही हल्ला झाल्याचं उघड झालं आहे.दक्षिण केरळमधल्या कोल्लममध्ये ही घटना घडली असून, आरोपी रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयसोलेशन वॉर्डातील एका रुग्णाला चहा उशिरानं मिळाल्यानं त्यानं चक्क नर्सच्या कानशिलात लगावली आहे. मस्कतवरून परतलेल्या कोरोनाबाधिताला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चहा उशिरा मिळाल्याच्या कारणास्तव त्यानं हे कृत्य केलं असून, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, नर्सिंग स्टाफ आणि इतर अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्तांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींनी परवानगीशिवाय बाहेर जाऊ नये. कोझिकोडमध्ये माजी खासदारानं मुलाची चौकशी करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु त्या खासदाराने हा आरोप फेटाळून लावला होता. दुसरीकडे आखाती देशातून परतलेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीने मलप्पुरममधील एका आशा (सामाजिक कार्यकर्त्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या) कामगाराच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या व्यक्तीला अटक करून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या