Coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांच्या पार; रविवारी ७४,३८३ नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:27 AM2020-10-12T02:27:44+5:302020-10-12T06:49:54+5:30

Coronavirus News: कोरोनाची बाधा झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत पुन्हा शनिवारपासून सक्रिय झाले.

Coronavirus: The number of coronaviruses in the country exceeds 7 million; On Sunday, 74,383 new patients were found | Coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांच्या पार; रविवारी ७४,३८३ नवे रुग्ण सापडले

Coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांच्या पार; रविवारी ७४,३८३ नवे रुग्ण सापडले

googlenewsNext

नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ७४,३८३ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या ७० लाखांवर पोहोचली. तर, कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ६० लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण संख्या ७०,५३,८०६ आहे. कोरोनामुळे आणखी ९१८ जण मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या १,०८,३३४ झाली आहे. देशात सध्या ८,६७,४९६ रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १२.३० टक्के आहे. अवघ्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवरून ७० लाखांवर पोहोचली. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८६.१७ टक्के आहे. रुग्णांचा मृत्युदर १.५४ टक्के इतका कमी आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा प्रचारकार्यात सक्रिय
कोरोनाची बाधा झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत पुन्हा शनिवारपासून सक्रिय झाले. आता माझी प्रकृती बरी असून, कोरोना आजार नाहीसा होत आहे, असे त्यांनी आपल्या समर्थकांसमोर भाषण करताना सांगितले. व्हाइट हाउसमधून त्यांनी हे प्रचाराचे भाषण केले आहे. ट्रम्प यांच्यामुळे इतरांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाही, असे त्यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी म्हटले आहे.

Web Title: Coronavirus: The number of coronaviruses in the country exceeds 7 million; On Sunday, 74,383 new patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.