शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

coronavirus : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजारांजवळ, 24 तासांत 48 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 11:06 IST

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.

ठळक मुद्देदेशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. आतापर्यंत 6 हजार 185 रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे.

नवी दिल्ली -  देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा वेग कायम असून, गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे. तसेच दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला असून, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात 381 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी 22.17 झाली आहे.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतसह परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्याच्या मागवण्याच्या मागण्या केल्या जाऊ शकतात. याशिवाय उद्योगांनादेखील दिलासा देण्याची मागणीदेखील केली जाऊ शकते. 

पंतप्रधान कार्यालयातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून राज्यांमधल्या स्थितीचा आढावा घेतील. देशात लागू असलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याचा केंद्राचा विचार आहे. त्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होईल. राज्यांच्या विविध मागण्या या बैठकीत ऐकल्या जातील. तर मोदी मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेची सेवा सुरू करण्यासह मजुरांच्या पलायनाच्या विषयावर चर्चा करतील. यासोबतच उद्योग पुन्हा सेवा करण्याबद्दल, रुग्णालयातल्या सुविधांविषयी मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत