शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

coronavirus: ज्या रुग्णालयात ५० वर्षे म्हणून सेवा दिली तिथेच व्हेंटिलेटर मिळाला नाही, ज्येष्ठ डॉक्टराचा तडफडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 1:33 PM

coronavirus In India : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यच काय तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही रुग्णसेवा मिळणे कठीण झाले आहे.

प्रयागराज (उत्तर प्रदेश) - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यच काय तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही रुग्णसेवा मिळणे कठीण झाले आहे. अशीच धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून समोर आली आहे. येथील प्रसिद्ध डॉक्टर जे.के.मिश्रा यांचा कोरोनाच्या संसर्गानंतर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृ्त्यू झाला आहे.  

दुर्दैवाची बाब म्हणजे डॉ. जे.के मिश्रा यांनी ज्या रुग्णालयात सुमारे ५० वर्षे सेवा दिली. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना शिकवले. त्याच रुग्णालयात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व्हेंटिलेटर मिळाला नाही. कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना व्हेटिलेटर मिळू शकला नाही. शेवटी त्यांनी त्यांच्या कोरोनाबाधित पत्नीसमोरच अखेरचा श्वास घेतला. स्वरूप राणी रुग्णालय हे प्रयागराजमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये ८५ वर्षीय डॉ. जे.के. मिश्रा यांनी आपल्या जीवनाची ५० वर्षे सेवा दिली होती. मात्र १६ एपिरल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना उपचार मिळवण्यासाठी कुटुंबीयांना बरीच धावपळ करावी लागली. डॉ. मिश्रा यांची पत्नी डॉ. रमा मिश्रा यांनी सांगितले की, १३ एप्रिल रोजी त्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जे.के. मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती अधिकाधिक बिघडत गेली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र व्हेंटिलेटरची व्यवस्था होऊ शकली नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरIndiaभारत