शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी लाखो वाहनधारकांना दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 2:17 PM

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.

नवी दिल्ली - देशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका आरटीओ आणि देशातील लक्षावधी वाहनचालकांनाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनचालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्राईव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्च पर्यंत वैध आहे त्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारने निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या वाहनचालकांच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्राईव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्चरोजी संपत आहे अशा वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

तत्पूर्वी, देशभरात टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्याचा निर्णय गडकरी यांनी काही दिवसापूर्वी घेेेतला होता. लॉकडाऊनच्या काळात टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल आकारला जाणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या १४ एप्रिलपर्यंत भारतात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली करता येणार नाही, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केले होते. अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याroad transportरस्ते वाहतूकRto officeआरटीओ ऑफीसNitin Gadkariनितीन गडकरी