शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 15:36 IST

CoronaVirus News : उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन यांनी ही माहिती दिली आहे. 

कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदेही ठप्प आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असून, अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांना पगार कुठून द्यावा हा प्रश्न सतावतो आहे. कोरोनाच्या संकटामुळे उबर इंडियानंही 600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. देशातील कंपनीच्या कर्मचार्‍यांपैकी कपातीचं प्रमाण हे 25 टक्के आहे. टाळेबंदीमुळे कपात करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये ड्रायव्हर्स, रायडर सपोर्ट यांचा समावेश आहे. उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर उबर इंडियानं हे पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. बऱ्याच व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. परमेश्वरन म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे, त्यांना 10 आठवड्यांचा पगार देण्यात येणार आहे. तसेच त्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांकरिता विमासुद्धा दिला जाणार आहे. तसेच कंपनी काढून टाकण्यात आलेल्या  कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यासाठीही सहकार्य करणार आहे. परमेश्वरन म्हणाले,  कोरोनाच्या परिणामामुळे आणि देशातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे उबर इंडियाकडे आपल्या कर्मचार्‍यांची कपात करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आज उबर कुटुंबासाठी आणि आपल्या सोडून जात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुःखद दिवस आहे.  विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अमेरिकेतील उबर टेक्नॉलॉजीज (जी उबर इंडियाची मूळ कंपनी आहे) यांनी कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे आपल्या कर्मचा-यांमध्ये 23 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUberउबर