शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

CoronaVirus News: चिंताजनक! दहा दिवसांत दुप्पट रुग्ण; देशात २२ दिवसांनी एका दिवसातील सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 1:26 AM

राज्यात ६,२८१ नवे कोराेनाचे रुग्ण; मुंबईतील १,३०५ इमारती सील

नवी दिल्ली/मुंबई : लसीकरणाची मोहीम सुरु असतानाच देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार शनिवारी देशात कोरोनाचे १३,९९३ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात सुमारे १४ हजार नवे रुग्ण सापडण्याची घटना २२ दिवसांनंतर घडली आहे.

२९ जानेवारी रोजी कोरोनाचे १८,८५५ नवे रुग्ण आढळून आले होते. इकडे महाराष्ट्रातही आज ६,२८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दहा दिवसांत नवे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. मुंबईतही रुग्ण आढळून आल्याने तेराशेहून अधिक इमारती सील कराव्या लागल्या आहेत. 

महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये दररोज आढळणारे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करायची असेल  तर कोरोना निर्बंधांचे काटेकोर  पालन केले पाहिजे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

मुंबईत लोकल पुन्हा सुरु केल्यानंतर सुरक्षा निर्बंधांच्या अंमलबजावणीत होत असलेली हलगर्जी रुग्णवाढीला कारणीभूत आहे, असे प्रशासनाने स्पष्टे केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह अमरावती आणि यवतवाळ जिल्ह्यांत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. 

देशामध्ये १०९७७३८७ कोरोना रुग्ण असून त्यातील १०६७८०४८  जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १०१ जण मरण पावले आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३१२७ आहे. देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण १.२७ टक्के आहे.  या आजारातून १ कोटी ६ लाख ७८ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. तर मृत्युदरात घट होऊन ते १.४२ टक्के झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत