शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

CoronaVirus News: महसूल मिळवण्यासाठी सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिली आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 15:13 IST

मद्यविक्रीसाठी 'या' मार्गाचा विचार करा; अर्थव्यवस्थेचा तोल सावरण्याच्या दृष्टीनं 'सर्वोच्च' सल्ला

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यानं महसुलाचा तुटवडा आणि उद्योगधंदे सुरू केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. महसूल मिळवण्यासाठी दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. लॉकडाऊन असल्यानं दारूची होम डिलिव्हरी करता येईल, असं न्यायालयानं सुचवलं आहे.'आम्ही याबद्दल कोणताही आदेश देणार नाही. मात्र राज्यांनी दारूच्या अप्रत्यक्ष विक्रीचा/होम डिलिव्हरीचा विचार करावा. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून दारूची विक्री करावी,' असं तीन न्यायमूर्तीच्या घटनापीठाचे प्रमुख असलेल्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं. देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपला. त्यानंतर देशभरात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ४ मेपासून देशभरात दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर लांबच लांबा रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.केंद्रानं निर्बंध शिथील केल्यानं राज्यांनी मद्यविक्री करण्यास सुरुवात केली. उद्योगधंदे बंद असल्यानं राज्यांचा महसूल आटला आहे. त्यामुळे महसूल मिळवण्यासाठी राज्यांनी दारूची दुकानं सुरू करण्याचे आदेश दिले. देशातल्या अनेक राज्यांना मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. बऱ्याचशा राज्यांचा २५ ते ४० टक्के महसूल मद्यविक्रीतून प्राप्त होतो. सध्या पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या राज्यांनी ऑनलाईन मद्यविक्री सुरू केली आहे. दिल्ली सरकारनंदेखील ऑनलाईन मद्यविक्री सुरू करण्याच्या विचारात आहे. याबद्दलची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिल्ली सरकारनं ऑनलाईन मद्यविक्रीसाठी http://www.qtoken.in हे संकेतस्थळ सुरू असून या माध्यमातून मद्यप्रेमींना ई-टोकन घेता येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय