शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

CoronaVirus News: तुम्ही सगळ्यांनी मोदींना 'हा' प्रश्न नक्की विचारा; मनमोहन सिंग यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 13:12 IST

CoronaVirus News: काँग्रेसप्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, सोनिया गांधी, मनमोहन सिंग उपस्थित

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा वाढता कहर आणि त्याला रोखण्यासाठी सुरू असलेला लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तिसरा लॉकडाऊन १७ मे रोजी संपेल. त्यानंतर सरकारची नेमकी योजना काय, असा सवाल सोनिया गांधींनी उपस्थित केला.१७ मेनंतर देशात काय होणार, सरकारनं लॉकडाऊन सुरू ठेवण्यासाठी काय निकष लावले, तिसऱ्या लॉकडाऊननंतर सरकारची रणनीती काय, असे अनेक प्रश्न सोनिया यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत उपस्थित केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील सोनिया गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तिसऱ्या लॉकडाऊननंतर नेमकं काय होणार, हे सरकारनं सांगायला हवं. लॉकडाऊननंतरची योजना काय, याची माहिती सरकारनं द्यायला हवी, असं मनमोहन सिंग म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनची स्थिती जाणून घेण्यासाठी सगळ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मुद्दे मांडण्याची संधी मिळते. त्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना एक महत्त्वाची सूचना केली. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडे काय योजना आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारावा, असं मनमोहन सिंग म्हणाले. राज्यांना आर्थिक पॅकेज मिळत नसेल, तर देश यातून कसा बाहेर पडेल, असा प्रश्न राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनमुळे महसुली उत्पन्न १० हजार कोटी रुपयांनी घटलं आहे. आम्ही वारंवार पंतप्रधानांकडे पॅकेजची मागणी करत आहोत. मात्र आतापर्यंत त्यांनी यावर उत्तर दिलेलं नाही, असं गेहलोत म्हणाले. सरकारी रुग्णालयांत सेवा द्या, अन्यथा...; खासगी डॉक्टरांना सरकारचे आदेशलॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर संकट; PF व्याजदरात कपात, जाणून घ्या...

लॉकडाऊनचा जबर फटका, देशात १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी