शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 12:53 IST

आरोग्य कर्मचार्‍यांना स्वतंत्रपणे सुविधा आणि वेळेवर वेतन देण्याची मागणी केली होती, ज्यात डॉक्टर आणि इतर संबंधित आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश होता.

नवी दिल्लीः आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार अन् सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. डॉ. आरुषी जैन यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी केली. या याचिकेत त्यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात अग्रभागी लढत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना स्वतंत्रपणे सुविधा आणि वेळेवर वेतन देण्याची मागणी केली होती, ज्यात डॉक्टर आणि इतर संबंधित आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश होता.या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांना वेळेत पगार द्यावा, असे सांगून केंद्र सरकारने आधीच परिपत्रक जारी केले होते. त्यावर आता राज्यांचे मुख्य सचिव निर्णय घेऊ शकतात. या नियमाचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाल्यास शिक्षा होऊ शकते, असंही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केलं आहे.  सॉलिसिटर जनरलचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या प्रकरणात लक्ष घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना पगार व इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत संबंधित सूचना राज्यांना पाठविण्यास सांगितले आहे. कोर्टाने चार आठवड्यांमध्ये डॉक्टरांच्या पगारासंदर्भातील अहवाल देण्यास सांगितले आणि आदेशाचे पालन न करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या