शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहानग्यांना किती धोका?; WHO-AIIMSचा महत्त्वपूर्ण अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:47 AM

CoronaVirus News: एम्स आणि डब्ल्यूएचओकडून देशात सीरो सर्वेक्षण; अंतरिम आकडेवारी प्रसिद्ध

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यादृष्टीनं अनेक राज्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लहान मुलांसाठीचे बेड्स, त्यांच्यासाठीच्या वेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा (एम्स) एक अहवाल समोर आला आहे.महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एम्सनं केलेल्या सीरो सर्वेक्षणातील आकडेवारी दिलासा देणारी आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना वयस्करांच्या तुलनेत अधिक धोका नसेल, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांमधील SARS-CoV-2 सीरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं सर्वेक्षण सांगतं. देशाच्या ५ राज्यांमधील १० हजार व्यक्तींचा सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्वेतील अंतरिम आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. तर अंतिम आकडेवारी लवकरच अपेक्षित आहे.

एम्स दिल्लीचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. पुनीत मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार दक्षिण दिल्लीतल्या शहरी भागांमध्ये असलेल्या रिसेटलमेंट वसाहतींमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त (७४.७ टक्के) होता. या वसाहतीत लोकसंख्येची घनता अधिक आहे. जास्त पॉझिटिव्हिटी रेटचा अर्थ बहुतांश लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रतिकार करू शकणाऱ्या अँटिबॉडी तयार झाल्या आहेत असा होतो. दुसऱ्या लाटेच्या आधीही दक्षिण दिल्लीत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या