शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: प्लाझ्मा थेरपीने घटले नाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण; आजार रोखण्यातही अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 06:35 IST

प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती.

नवी दिल्ली : प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही किंवा हा आजार रोखलाही जात नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने यासंदर्भात एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती. तिच्या निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोनाची माफक प्रमाणात लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले व ज्यांच्यावर हे उपचार करण्यात आले नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे सुमारे २८ दिवस निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण व आजार रोखला जाणे याबाबत प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरली नसल्याचे दिसून आले.

कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या लोकांचे रक्त या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिले जाते. हे लोक बरे व्हावेत यासाठी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपी वापरली जाते. कोरोनातून बºया झालेल्या लोकांच्या रक्तात अँटीबॉडीज असतात. त्यांच्यामुळे रुग्ण आजाराविरोधात मुकाबला करू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटले होते. प्लाझ्मा थेरपी कितपत प्रभावी आहे यासंदर्भात चीन व नेदरलँड्स येथे यापूर्वी करण्यात आलेली पाहणी अर्धवट राहिली होती.

परिणामकारकता दिसली नाही

प्लाझ्मा थेरपी किती उपयोगी ठरते, हे तपासून पाहण्यासाठी आयसीएमआरने देशातील ३९ रुग्णालयांमध्ये त्याविषयीची पाहणी २२ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान केली. त्यामध्ये ४६४ जणांनी सहभाग घेतला. त्यातील २३५ जणांना प्लाझ्मा थेरपीचे उपचार देण्यात आले, तर २२९ जणांना प्लाझ्मा देण्यात आला नाही. त्यापैकी प्लाझ्मा दिलेल्यांपैकी ३४ जण, तर न दिलेल्यांपैकी ३१ जण मरण पावले. कोरोना रुग्णांच्या उपचारांत प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी काही देशांमध्ये देण्यात आली आहे. मात्र, कोरोनावर प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरत नाही, हे आयसीएमआरच्या पाहणीत दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत