शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

CoronaVirus News: तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 08:49 IST

CoronaVirus News: केवळ ४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक असताना आरोग्यमंत्र्यांचं ट्विट; रेल्वेमंत्र्यांनी लगेच चक्रं फिरवली

दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशात दोन आठवड्यांपूर्वी सर्वप्रथम दिवसभरात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांतच हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. आता गेला आठवडाभर देशात दररोज कोरोनाच्या २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताना दिसत नसल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. 'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आलादिल्लीतील रुग्णालयांची क्षमता जवळपास संपत आली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. दिल्लीतल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यानं तातडीनं पुरवठा करण्याची विनंती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना केली. 'जीटीबी रुग्णालयात ५०० रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहे. केवळ ४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे,' असं ट्विट जैन यांनी केलं. ऑक्सिजन वेळेत न पोहोचल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती होती.राज्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन? जिल्हाबंदी; उद्धव ठाकरे घोषणा करणारजैन यांच्या ट्विटनंतर काही तासांतच उत्तर प्रदेशच्या मोदीनगरमधून १४ टनांचा ऑक्सिजन टँकर निघाला आणि जीटीबी रुग्णालयाजवळ पोहोचला. उत्तर प्रदेश पोलीस दलाचे २ कर्मचारीदेखील टँकरसोबत होते. ऑक्सिजनचा टँकर पोहोचण्यास उशीर झाला असता, तर अनेक रुग्णांचा जीव संकटात सापडला असता. मात्र ऑक्सिजन टँकर उपलब्ध होऊनही रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याची तक्रार अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. तुमच्या कुटुंबीयाचा, नातेवाईकाचा जीव वाचवायचा असल्यास स्वत: ऑक्सिजन सिलिंडर घेऊन या, असं जीटीबी रुग्णालयाचे कर्मचारी सांगत असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. रुग्णालयाच्या डिस्प्ले बोर्डवर आयसीयू बेड आणि ऑक्सिजन बेडचा तपशील देण्यात आला आहे. मात्र तिथे देण्यात आलेल्या माहितीपेक्षा प्रत्यक्षातील स्थिती जास्त भीषण आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या